You are currently viewing गुलाबस्तवन..!!
Oplus_16908288

गुलाबस्तवन..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलाबस्तवन..!!*

 

तिरप्या किरणांचा पाठलाग

हाच…तुझा निराकार छंद

गर्भरेशमी …गर्भार डोहात

ओच्यात पसरला ..सिंदूरीगंध

 

उपजत ..कांती मिरवतांना

रंगलावण्यात ..आरतीस सजला

कळ्यांना.. परागकणांनी झुलवत

आसक्तीने …..शृंगारात बहरला

 

लख्ख दिप्तीचे ..व्रत मोडून

सौंदर्यात ..पार बुडालास

शुभ्र कौमुदीच्या कौमर्यात

यौवनात ..पदापर्ण झालास

 

सत्व..रज..तम ..

त्रिभुवनात ईश्वररूपात अवतरलास

कमलस्पर्श ब्रम्हतेज.. ब्रम्हरंध्रातून

अंगणात…..माझ्या आलास….

 

ब्रम्हांडाच्या शोधात अख्खे विश्व

मुक्काम तुझा ..ईश्वरासोबत

तूच कटिवर ..पाकळ्या ठेवून

उभा मातीच्या ..पवित्र गाभा-यात

 

बाबा ठाकूर कवीमाळी

प्रतिक्रिया व्यक्त करा