फोंडाघाट नरेंद्र महाराज ट्रस्टचे हॉस्पिटल ५० खाटांचे होणार
हॉस्पिटलसाठी एक एकर जागा विनामूल्य देण्याची तयारी; आमदार प्रमोद जठार व सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांचा पुढाकार
फोंडाघाट : प्रतिनिधी
फोंडाघाट येथील नरेंद्र महाराज ट्रस्टच्या हॉस्पिटलचा विस्तार करून ते ५० खाटांचे हॉस्पिटल करण्याचा मानस असून, या कामासाठी ट्रस्टच्या माध्यमातून एक एकर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. आमदार प्रमोद जठार आणि सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या माध्यमातून यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
या हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. हॉस्पिटलच्या विविध युनिटपैकी एखाद्या युनिटला आपल्या वडिलांचे नाव देण्यात यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी हॉस्पिटलमधील हॉललाही वडिलांचे नाव देण्यात आले आहे.
या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी आमदार प्रमोद जठार यांच्या समवेत मुंबई येथे भेट घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी दिली.
