You are currently viewing माझी खाद्य संस्कृती

माझी खाद्य संस्कृती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी राजा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*माझी खाद्य संस्कृती*

*(भाग-०५)*

*पठाणकोट/अंबाला*

 

*संदर्भ TD वरचे*

 

*खाद्य संस्कृती* केवळ *नासिक* पुरतीच सीमित असावी का ?

तर उत्तर अर्थातच *”नाही”*

 

*TD* निमित्ताने बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला, त्यानिमित्ताने त्या त्या ठिकाणचे अनुभव मनी फेर धरतात.

 

एकदा *पठाणकोट* ला गेलो होतो.*चक्की बँक* मार्गे पठाणकोट, *हॉटेल —-embassy* -मध्ये रहात होतो.तिथलं हॉटेलिंग काय सांगावे ?

हॉटेल समोरच *SBI ची ब्रँच* आहे आणि तिथेच एक स्मॉल कँटीन पण आहे.

सकाळी उठल्यानंतर ऐरफोर्स स्टेशन जाण्यापूर्वी तिथं नाष्टा चहापाणी.

नाष्टा काय तर ऑम्लेट.

ऑम्लेट तर ऑम्लेट म्हंटलं दे बाबा !

तर त्यानं चक्क तीन अंड्यांचं ऑम्लेट बनवलं हो!

तीन ? तर तो म्हणाला हो तीन.

“यहांपर तीन का ही बनता है दो का नहीं.”

गपगुमान खाल्लं सांगतो कुणाला?

शेअरिंग ऑटो करून ऐरफोर्स स्टेशनला

तिथे पोहोचल्यावर सर्व रीतसर एन्टऱ्या करून आंत.

एखाद्या तासाने टी ब्रेक झाला, चक्क भूख लागली होती हो !

 

मग,हँगर कँटीन मध्ये *अंडा पकोडा* हाणला.

दुपारचे जेवण बुक करुन पुन्हा काम सुरु.

दुपारी दीड वाजता बुक केलेल्या जेवणावर तुटून पडलो,पुन्हा थोडा वेळ काम करून पॅकअप केले.

लॉजवर येऊन आराम केला नि संध्याकाळी फिरायला निघालो आम्ही सर्व जण रस्त्यात एक मिठाईचं दुकान होतं, जिथले गुलाबजाम जाम फेमस, म्हटलं दे एक प्लेट, तो म्हणाला थांबा गरमागरम काढतो.

*”गुलाबजाम नि गरम ?”*

गुलाबजाम हे गरमच खायचे असतात हे सर्व प्रथम *पठाणकोट* ने शिकवले.

 

रात्रीच्या जेवणात आख्खी तंदुरी चिकन साफ

पहिल्याच दिवशी पठाणकोटच्या पंजाबी पाण्याने असर दाखवला,

*कुछ भी और कितना भी खाओ हजम ! नो प्रॉब्लेम*.

 

लॉजच्या समोरच्या बाजुला एक व्हेज खानावळ आहे.

सर्व साधारण लोक तिथे जेवत, खूपच स्वस्त तरी चविष्ट.अधूनमधून तिथे जेवायचो.बाजूला गरीब लोक असायचे आश्चर्य वाटले ते म्हणजे ते लोक येतांना अमूल बटरच्या चकत्या घेऊन यायचे आणि ते लावल्याशिवाय रोटी खात नव्हते.

 

*पठाणकोट* म्हटलं की *अंबाला केंट* आलंच,आणि *अंबाला केंट* म्हटलं की *पुरण सिंगचा ढाबा* आलाच आणि तिथली ती चीकन आलीच आली.

*चिकन खावी तर पुरणसिंगच्या ढाब्यावरच.*

 

*पठाणकोट* पासून वर *हिमाचल* मध्ये जायला *स्मॉलगेज रेल्वे* आहे.

एका शनिवार रविवारी *ज्वालाजी* ला जायचा प्लॅन केला.

नेमकी ती *पौर्णिमेची रात* होती.

*पॅरामाउंट पिक्चर्स* चा लोगो आहे ना ते उंच पर्वत शिखर आणि त्याभोवती तारकांची अर्धगोलाकार महिरप, अगदी तस्सच दृश्य रस्त्याने जातांना एका दरीत दिसलं.

 

अजून एक अनुभव सांगण्यासारखा आहे, एका स्टेशनवर गाडी थांबली प्लॅटफॉर्मवर उतरून चहाच्या ठेल्यावर गेलो, त्या व्हेंडरने चहा देतो पण ग्लास तुमचा घेऊन या म्हणाला.

असं “का?” विचारले तर तो म्हणाला,

“ये चाय सफर मे चुसकीयां लेते लेते पीनेकीं चीज है साब, आप आजमाके देखो”

आणि खरंच होतं त्याचं तो चहा नुसता पिऊन टाकण्याचा नव्हता, *चुस्कीयो वाली चाय थी वो !*

दुर्दैवाने आज त्या स्टेशनचे नाव विसरलो धर्मशालाच्या जवळपास होते ते.

 

*पठाणकोट* असो वा *कानपूर* ह्या दोन्ही ठिकाणचे ट्रॅफिक पोलिस मला *स्थितप्रज्ञ* का काय म्हणतात तसे वाटतात, म्हणजे बघा कितीही गर्दी असो ते चौराह्यावर उभे राहून हात करत असतात, मग भलेही पब्लिक त्या हाताखालून निघून का जाईना !

 

—राजा जोशी

🤔〰️〰️〰️〰️🤔

प्रतिक्रिया व्यक्त करा