You are currently viewing मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या आयुष निर्गुणची क्रिकेट स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या आयुष निर्गुणची क्रिकेट स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी!

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या आयुष निर्गुणची क्रिकेट स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी!

सावंतवाडी

मॅक फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फँटम ग्रँड यू-12 कप’ क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल, सावंतवाडीचा विद्यार्थी आयुष निर्गुण याने उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या खेळाचा ठसा उमटवला.
संपूर्ण स्पर्धेत आयुषने १७ गडी बाद करत आपल्या संघाच्या विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या प्रभावी गोलंदाजीसह अष्टपैलू कामगिरीची दखल घेत त्याला ‘उत्कृष्ट गोलंदाज’ तसेच ‘मालिकावीर’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
आयुषला प्रशिक्षक श्री. राहुल रेगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आयुषच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब खेमसावंत भोंसले, चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले, विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, मंडळाचे संचालक श्री. दिलीप देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत व डॉ. सतीश सावंत, मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा साळगांवकर, तसेच प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आयुषचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा