You are currently viewing सुबुद्धी देवो तो सर्वांना

सुबुद्धी देवो तो सर्वांना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुबुद्धी देवो तो सर्वांना*

 

श्रध्देचा जाहीर बाजार

आणि दुसरं होणार काय

गरीब भोळे धंदे सोडून

वळती तिकडे लक्ष पाय

//1//

नसून क्षमता आवरण्याची

अवतन देतात मोठे फार

टाकून येतात काम धाम

पहाण्या दुरून श्रद्धा बाजार

//2//

आम्हीच आहोत बावळट

त्याच्या हाती आहे काय

उभा राहतो *दर वर्षी*

कधी करून वरती पाय

//3//

ऐकून ऐकून वैताग येतो

लिहितो आपण सडकून

त्याला कुठे *ऐकू येत*

कान घेतो तो *मिटून*

//4//

मिटून डोळे पुजू आपण

हृदयी असलेल्या देवाला

हिऱ्यासारखे नसती कॅरेट

बेगडी उघड्या *श्रद्धेला*

//5//

दुष्काळ निवारणार आहे तो

लोकशाहीचा लेहेंगा कुडता

उरावर बसतो रोज उठून

मुलाखत देतो उठता बसता

//6//

 

विनायक जोशी🖋️ ठाणे

2809/9324324157

प्रतिक्रिया व्यक्त करा