*”जितनेवाले कोई अलग काम नहीं करते, वे हर काम अलग ढंग से करते हैं!”* – शिव खेरा
ही ओळ श्री. विकास खारगे यांच्या व्यक्तिमत्त्वावर तंतोतंत खरी उतरते. ते सेकंदात विचार करतात, सेकंदात निर्णय घेतात आणि सेकंदात कृती करतात.
*एक जुलै 2026. सकाळची वेळ.*
माझ्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर नाव पाहिले तर… महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव राहिलेले आणि आता महाराष्ट्राचेच अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांचे नाव दिसले! माझ्या 73 राव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी हा फोन केला होता. विचार करायला लावणारी बाब: मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव राहिलेले व विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही अशा अविश्वसनीय व्यस्ततेतूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ *काढला*. मला भेटून बोलण्यापेक्षा पी.ए.ला फोनवरून सांगणे सोपे असते, पण नाही! त्यांनी *स्वतः* फोन केला. खऱ्या चांगल्या माणसांचे हेच वैशिष्ट्य: ते प्रत्येक काम वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने करतात. तात्काळ करतात. त्यांच्याकडे कधीही *पेंडिंग* काम राहत नाहीत.
*आमचा परिचय पंचवीस वर्षांपूर्वीचा.*
सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे सध्याचे आयकर आयुक्त श्री. अभिनय कुंभार यांची कुंभार यांच्या घरी भेट झाली.चर्चा झाली . आम्ही अमरावती येथे”मिशन आयएएस” सुरू करण्याचे ठरविले. वर्ष २०००. उद्घाटन करायला कोणाला बोलावू? मनात आले ते श्री विकास खारगे यांचे नाव: ते तेव्हा यवतमाळचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते. श्री. विकास खारगे त्या काळात ते आपल्या कार्यक्षमतेमुळे सर्वत्र चर्चित होते. मी यवतमाळला गेलो.
*”सर, मी नरेशचंद्र काठोळे. अमरावतीत आयएएसची प्रशिक्षण कार्यशाळा सुरू करतोय. आपण उद्घाटन करायला हजर राहाल का?”* माझा प्रस्ताव ऐकताच ते म्हणाले
*”हो, नक्की. तारीख सांगा,”* त्यांनी सहजपणे निमंत्रण स्वीकारले .
१२ मे २०००. अमरावतीच्या दंत महाविद्यालयात अमरावतीच्या इतिहासातील पहिली स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न झाली. कार्यक्रम संपल्यावर खारगे साहेब माझ्या जिजाऊ नगरातील घरी आले. जमिनीवर बसून जेवण केले. त्यांच्या वागण्यात कुठलाही औपचारिकपणा नव्हता, तर मैत्रीचा सहजपणा होता.
*साधी राहणी. उच्च विचारसरणी.*
आज ते मुख्य सचिव होण्याच्या मार्गावर आहेत. पण खादीचे कपडे, सरळ वृत्ती, सामान्य माणसांशी असलेला नैसर्गिक संवाद हे त्यांचे वैशिष्ट्य बनले आहे. ते *सेकंदात* काम करतात. मी चांगल्या कामासाठी कधीही फोन केला, तर काही सेकंदांतच प्रतिसाद मिळतो. अगदी मध्यरात्री देखील! कधीकधी तर *फक्त चार मिनिटात *! त्यांची ही तत्परता त्यांना खरोखरच व्यस्त ठेवत नाही; कारण व्यस्त ते असतात जे काम पुढे ढकलतात!
*परवाची घटना.*
अमरावतीच्या श्री संत गाडगेबाबा समाधी मंदिर संस्थेचे श्री. प्रकाश महात्मे माझ्याकडे आले. खारगे साहेबांना भेटायचे होते. मी त्यांना एसएमएस पाठविला. *फक्त १९ सेकंदांत* प्रतिसाद आला: *”उद्या दुपारी ४ वाजता येऊ शकतात.”* एवढेच नाही! दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या सहाय्यिका श्रीमती शुभांगी जाधव यांचा फोन:
*”सर, श्री. महात्मे किती वाजता येणार आहेत? त्यांना पास बनवायचा आहे. गाडीने येणार असतील तर गाडीचा नंबर सांगा, गेटवर सांगितला जाईल.”*
पाहिले! ही तत्परता! ही संवेदनशीलता! साहेबांनी स्वतःबरोबरच संपूर्ण कार्यालयीन यंत्रणा देखील या गुणांनी भरली आहे. शुभांगी जाधव मॅडमच्या बोलण्यात आत्मीयता होती, जिव्हाळा होता.
*कोरोनाकाळातील प्रसंग.*
माझे मित्र प्रा. प्रवीण विधळे यांनी संशोधन करून सिद्ध केले होते की साबणाचा फेस कोरोनावर प्रभावी आहे. पण कोण घेणार दखल? मी खारगे साहेबांना फोन केला. सर म्हणाले
*”सर, प्रा. विधळे यांचा संशोधनाविषयी फोन आलाय. लगेच अधिकारी नेमतो आणि तुमच्याशी संपर्क करतो,”* त्यांनी त्वरित सांगितले.
अधिकाऱ्यांचा फोन आला. संशोधन समजून घेतले गेले. अमरावती महानगरपालिकेने ठिकठिकाणी प्रात्यक्षिकेही घेतली. काम झाले!
*उत्तराखंडमधील आपत्ती.*
ढगफुटीमुळे महाराष्ट्रातले अनेक पर्यटक अडकले होते. राज्य शासनाला एक सक्षम अधिकारी तिथे पाठवायचा होता. निवड झाली ती श्री. खारगे यांची. ते तिथे गेले आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन पर्यटकाला सुखरूप घरी पोहोचविले. हे काम त्यांनी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर *तन-मन-धनाने*, *आत्मीयतेने*, *जिव्हाळ्याने* केले. त्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीचा महाराष्ट्र शासनाने सन्मान केला.
*इचलकरंजी गावाचे .*
गेल्या वर्षी मी त्यांच्या गावी गेलो होतो. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या आयोजनातील एक कार्यक्रम खारगे साहेब ज्या शाळेत शिकले त्या गावात होता. शाळेतील शिक्षक ते आदराने आठवत होते. कार्यक्रमानंतर मी साहेबांच्या घरी गेलो. साधेसुधे घर. दरवाजा उघडताच समोर हातमाग! तो सुस्थितीत आणि चालू अवस्थेत होता. साहेबांचे वडील (वय ८० वर्षांवर) हातात पुस्तक घेऊन भेटायला आले. वाचनाचा छंद! हा छंद वडिलांकडून विकास सरांना मिळाला असावा. त्यामुळे आयएएसची पहिल्या क्रमांकाची परीक्षा त्यांनी उच्च श्रेणीत पास केली. घरात मुख्य सचिवाचा मुलगा असल्याचा अहंकार नव्हता; होते ते निसर्गाचे *घरपण**. त्यांचे बंधू मला कारपर्यंत सोडायला आले. कारमध्ये बसल्यावर मी साहेबांना फोन केला:
*”सर, भेटून आलो. बंधूने आपले फोटो काढलेत. तुम्हाला पाठवतो.”*
*”हो हो, मी पाहिलेतच! आभारी आहे.”*
साहेबांची तत्परता आणि आत्मीयता त्यांच्या कुटुंबातही दिसून आली.
*अमरावती दौर्याची आठवण.*
जेव्हाही साहेब अमरावतीला येत, तेव्हा मला फोन येई:
*”प्राध्यापक साहेब, विश्रामभवनात या. चहा घेऊ या.”*
ते उपस्थित अधिकाऱ्यांची ओळख करून देत. स्नेहभोजनावर बोलावत.
.
श्री. विकास खारगे हे प्रशासनात सकारात्मक बदल घडवू शकणाऱ्या सनदी अधिकाऱ्याचे *मूर्तिमंत* उदाहरण आहेत. गावाची माती, गावाची नाती त्यांनी नेहमी जपली आहेत. सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी ते तन-मन-धनाने झटतात. अशा या अप्रतिम व्यक्तिमत्त्वाला, महाराष्ट्राच्या अपर मुख्य सचिव श्री. विकास खारगे यांना हार्दिक शुभेच्छा!*
*प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे*
*संचालक,*
*मिशन आयएएस,*
*अमरावती कॅम्प*
9890967003
