कुडाळमध्ये बंद गॅरेजला अचानक आग; दुरुस्तीचे साहित्य जळून नुकसान
कुडाळ : प्रतिनिधी
कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सोमा सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले.
आगीची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रीराम शिरसाट यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
दरम्यान, गॅरेज बंद असताना आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
Make the headline more concise
Simplify the list of officials
Replace repeated fire wording
