You are currently viewing शिवसेना सचिव, खासदार विनायकजी राऊत यांच्या 67 व्या वाढदिवसा निमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने 25 कष्टकरी महिलांचा यथोचित सन्मान

शिवसेना सचिव, खासदार विनायकजी राऊत यांच्या 67 व्या वाढदिवसा निमित्त शिवसेना महिला आघाडीच्या वतीने 25 कष्टकरी महिलांचा यथोचित सन्मान

लोकसभा शिवसेना गटनेते, सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार, शिवसेना सचिव श्री.विनायकजी राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने नेहमीच दुर्लक्षित असणाऱ्या 25 कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शिरगाव रामनगर येथे महिला आघाडीच्या सौ.प्रतिक्षा साटम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी कष्टकरी महिलांना गृहोपयोगी भेटवस्तु देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
“कष्टकरी महिला या समाजात नेहमीच दुर्लक्षित असतात. परंतु त्यांचा देखील योग्य सन्मान होणे गरजेचे आहे. खासदार राऊत हे सर्वसामान्य जनतेचे खासदार असुन आम्ही नेहमीच त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यक्रम राबवत असतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या प्रेरणेतून खासदार विनायकजी राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सर्वसामान्य कष्टकरी महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला,” असे सौ.प्रतिक्षा साटम यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संजना देवळेकर, सुचिता घाडी, रेश्मा मेस्त्री, भाग्यश्री तावडे, ज्योती जाधव, भारती शिरगावकर, लक्ष्मी वायंगणकर, वेदांगी राणे, समिक्षा सावंत, पुजा सावंत यांच्यासह 25 कष्टकरी महिलांचा गृहोपयोगी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. आमच्या कामाची दखल घेऊन यथोचित सन्मान केल्याबद्दल कष्टकरी महिलांनी शिवसेना महिला आघाडीचे आभार मानले.
हा कार्यक्रमाला शिवसेना महिला आघाडीच्या सौ.प्रतिक्षा साटम यांच्यासह अनुराधा साटम, प्रेरणा साटम, वर्षा साटम, यामिनी साटम, विधी देवळेकर, मिनल साटम, रेश्मा साटम, साक्षी साटम, दिक्षा साटम, करूणा वाडीये, सविता साटम, सुवर्णा मेस्त्री, सुगंधा तोरसकर, समिक्षा ठूकरूल, लता मेस्त्री, वैभवी साटम आदी महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा