You are currently viewing अपघातग्रस्त तरुणाला नातेवाईकांनी रुग्णालयात सोडून दिले; गोवा बांबोळीला हलवण्याची गरज

अपघातग्रस्त तरुणाला नातेवाईकांनी रुग्णालयात सोडून दिले; गोवा बांबोळीला हलवण्याची गरज

*अपघातग्रस्त तरुणाला नातेवाईकांनी रुग्णालयात सोडून दिले; गोवा बांबोळीला हलवण्याची गरज*

*सावंतवाडी –

महेंद्र मुकुंद राऊळ (वय 25, रा. मळगाव पिंपळवाडी, ता. सावंतवाडी) या तरुणाला शुक्रवारी दुपारी अपघात झाल्याने नातेवाईकांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

डॉ. ओमकार कोल्हे व डॉ. अनिकेत गुरव यांनी तपासणी करून औषधोपचार, इंजेक्शन व सिटीस्कॅन केले. डोक्याला दुखापत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोवा बांबोळी (GMC) येथे पाठवण्याचा सल्ला दिला.

मात्र नातेवाईकांनी जाण्यास नकार देऊन रुग्णाला रुग्णालयातच सोडून दिले. त्यांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधूनही संपर्क होत नसल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कल्पना दिली.

याबाबत डॉक्टरांनी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते व प्रहार वृत्तपत्राचे पत्रकार सचिन रेडकर यांना खबर देऊन नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन केले.

रुग्णाची प्रकृती गंभीर असून त्याला तातडीने गोवा बांबोळीला हलवणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा