You are currently viewing विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने कोणाचेही विज कनेक्शन तोडू नका…

विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने कोणाचेही विज कनेक्शन तोडू नका…

राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी : लॉकडाऊन काळातील विज बिल भरण्यासाठी वेळ द्यावा

सावंतवाडी

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज विद्युत महामंडळ कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी लॉक डाऊन काळातील विज बिल भरण्यासाठी वेळ द्यावा. तसेच टप्प्याटप्प्याने भरून घ्यावे. येथील जनता विज बिल थकवणार नाहीत. त्यामुळे विज कनेक्शन कोणाचेही तोडू नये. सद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. अशी मागणी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी विज वितरण उपअभियंता एस.एस. भुरे याना केले आहे. तसेच यावेळी अजूनही मागणी करून मीटर न दिल्याने ते आक्रमक होत याबाबत त्यांना जाब विचारला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेंमकर, हिदायतुल्ला खान, प्रसाद दळवी, आशिष कंदम, शफिक खान, जावेद शेख, आसिफ शेख ,राजू धारपवार, पप्पू शेख, सुरेश वडार, संतोष जोईल, कौतुक नाईक, नवल साटेलकर, अमर धोत्रे, भरत गावकर, संकेत शेटकर असीम वागळे, नितीन सातपुते, इफतेकार राजगुरू, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + two =