*सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ डॉ. अतुल बोरे यांची नियुक्ती*
*सावंतवाडी* –
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शासनाने सूक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ म्हणून डॉ. अतुल बोरे यांची नियुक्ती केली आहे.
मूळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील असलेले डॉ. बोरे यांनी एमबीबीएस व पोस्ट ग्रॅज्युएशन शिक्षण संभाजीनगर येथेच पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात काही वर्षे सेवा बजावली असून आता त्यांची बदली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे.
त्यांचे स्वागत जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी केले.
