You are currently viewing इळये येथे लागलेल्या आगीत सुमारे १ लाखाचे नुकसान

इळये येथे लागलेल्या आगीत सुमारे १ लाखाचे नुकसान

देवगड
इळये माळधोंड टेंब येथे अचानक लागलेल्या आगीमध्ये ४५ आंबा कलमे होरपळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. ही घटना १५ मार्च रोजी निदर्शनास आली.

देवगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कलमबाग मालक शिल्पा अनिल मुंबरकर रा.मिठमुंबरी बौध्दवाडी यांच्या इळये माळधोंड टेंब येथील कलमबागेला दि. ११ ते १५ मार्च या कालावधीत लागलेल्या आगीमध्ये ५० पैकी ४५ कलमे होरपळून सुमारे १ लाखाचे नुकसान झाले अशी तक्रार दिली आहे.तपास पो.हे.कॉ.उदय शिरगावकर करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 9 =