You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित प्रीमियर लीग स्पर्धेत सिंधुदुर्ग टायटन्स विजेता

सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित प्रीमियर लीग स्पर्धेत सिंधुदुर्ग टायटन्स विजेता

*आमदार नितेश राणे, भाजपच्या नेत्या सौ. वैशाली राणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण*

मुंबई:

नेरुळ जिमखाना ग्राउंड नवी मुंबई येथे मुंबईतील मानाची मानली जाणारी  सिंधुदुर्ग मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL 2021 ही क्रिकेट स्पर्धा पार पाडली. स्पर्धेचे उद्धाटन वरिष्ठ पोलिस अधिक्षक संतोष धनवटे, स्थानिक नगरसेवक विशाल डोळस आणि विनायक अपराज यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचे आयोजन चेतन रासम, अनिल मातेफोड, दीपक रासम, वसंत परब, स्वप्नील तेली, महेश चव्हाण, अमित धुरी यांनी केले होते. मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे  विनायक अपराज, मेघश्याम होडवडेकर, साईप्रसाद परब,परेश आचरेकर, संदीप गाडे आणि गुणलेखक दीपक धुरी या सर्वांचा आयोजन खाली मुंबई मधली स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेला  मुंबईतील बहुतांश क्रिकेट प्रेमीनी  सहकार्य केले. या स्पर्धेचे खास आकर्षण असलेले आपल्या लाडक्या मालवणी बोली भाषेत म्हणींची उधळण लावणारे बादल चौधरी यांची मुंबईतली पहिली समालोचन  करण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली. तसेच कुणाल दाते यांनी आपल्या उत्कृष्ट आवाजात समालोचन करत प्रेक्षकांची मने जिंकली.

 

या स्पर्धेदरम्यान  सर्व मान्यवरानी आपली उपस्थिती दाखवून या स्पर्धेला वेगळे स्वरूप दिले. तसेच You Tube live चा माध्यमातून संपूर्ण सिंधुदुर्ग प्रेक्षक या सामन्याचा आनंद लुटत होते आणि आपले कणकवली देवगड वैभववाडी चे आमदार नितेश राणे यानी आवर्जून उपस्थिती दर्शविली.  व्यासपीठावर एकनाथ रासम (विकास प्रतिष्टान हरकुळखुर्द अध्यक्ष) तुषार रासम. पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटना प्रदेशाध्यक्षा तथा भाजपच्या सौ.वैशाली राणे यांचा त्यांचा हस्ते सर्व बक्षिस समारंभ पार पाडण्यात आले तसेच या स्पर्धेत टोटल १८ संघांनी भाग घेतला होता.

 

सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर प्रीमियर लीग SPL 2021 च्या विजेतेपदाचा बहुमान

-सिंधुदुर्ग टायटन्स ( विकास कदम )

उपविजेतेपदाचा बहुमान

-अभिनव नागवे ( स्वप्नील पाताडे )

मालिकावीर चा बहुमान सिंधुदुर्ग टायटन्स च्या विकास कदम ने पटकावला.

उत्कृष्ट फलंदाज – जतीन कांबळी ( मसुरे पॅकर्स )

गोलंदाज- दत्ता ( पावणादेवी बेळणे )

क्षेत्ररक्षक- प्रग्नेश गुरव ( सिंधुदुर्ग टायटन्स ),

उत्कृष्ट कर्णधार- गिरकर ( पावणादेवी बेळणे),

तसेच सिंधुदुर्ग जिल्यातील आणि सिंधुदुर्ग   प्रीमियर लीग मध्ये बलाढ्य समजल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग प्ले बॉईज संघाचा पराभव करून प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या मसुरे पॅकर (मसुरे मालवण )संघाला सर्वोत्कृष्ट संघ- म्हणून गौरवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =