You are currently viewing घुनुघुनु घुनुघुनु…
Oplus_16908288

घुनुघुनु घुनुघुनु…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*घुनुघुनु घुनुघुनु…*

 

घुनुघुनु घुनुघुनु वाजत वारा

फुलवित मोर पिसारा

वनी नाचतो मोर छन् न छन्

आळवित मेघमल्हारा…

 

ढगांतूनी ती “ चपला” कडकड कडकड

फडफड झाड निवारा

उधळीत बैल शेपूट वरती

टप टप पडती धारा…

 

गोधन उधळे सैरवैर ते

बकऱ्या उधळत धूळ

आले परतून सांजावता ते

घरट्यातून गोकुळ..

 

आचळ सांडती दुग्ध शुभ्र ते

मुचुमुचु शेळ्या मेंढ्या

टपटप गळते दूध मुखातून

ढुश्या किती त्या वेड्या..

 

विसावती मग तृप्त होऊनी

चाटत कान नि गाल

कुठे उजळतो चांद कपाळी

सुंदर दिसते भाल…

 

अशी मनोहर सांज उजळते

खेड्यातून सुंदर

कुठे वाजती घंटा किणकिण

स्नेहदीप मंदिर…

 

प्रा. सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा