*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी विनायक जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मोह कुणाला ना आवरतो*
बसून कुणा राहावेल का
अस्वस्थ करतो त्याला वास
आंबेमोहर असा दरवळे
उडी मारली *पाहून रास*
//1//
असे जरी तो बाल गणेश
मोह कुणाला का चुकला
पाहून सुटले सोंडेस पाणी
तांदूळ राशीवर तो बसला
//2//
काय भरवसा यजमानाचा
वाटून टाकील *सर्वांना*
रहावे लागेल उपाशी रात्री
कठीण होईल भूक आवरताना
//3//
वाट पाहून थकून गेला
नाही झाली आरती सुरू
मुहूर्त गेला *टळून जरी*
मनी म्हणाला कोणा विचारू
//4//
करून हिय्या मनात मोठा
स्मरण केले *यजमानाचे*
मनात मागून क्षमा थोडी
धाडस केले मोदक घ्यायचे
//5//
पूजा करावी *वेळेवरती*
बाप्पा सुद्धा *तळमळतो*
म्हणून *सांगतो सर्वांना*
मोह कुणाला ना आवरतो
6
विनायक जोशी 🖋️
वसंत विहार, ठाणे
93 24 32 41 57
