You are currently viewing फोंडाघाट प्रशाळेच्या विद्यार्थिनीची दिल्लीतील NCC स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

फोंडाघाट प्रशाळेच्या विद्यार्थिनीची दिल्लीतील NCC स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

फोंडाघाट प्रशाळेच्या विद्यार्थिनीची दिल्लीतील NCC स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

दिल्लीतील NCC स्पर्धेत कृष्णाई रावराणेची दमदार कामगिरी
फोंडाघाट प्रशाळेच्या विद्यार्थिनीचा विजयी मिरवणुकीतून गौरव; शाळेत सन्मानचिन्ह देऊन सत्कार

फोंडाघाट :

फोंडाघाट प्रशाळेची विद्यार्थिनी कृष्णाई देविका नंदकिशोर रावराणे हिने दिल्ली येथे झालेल्या एनसीसी कॅडेट स्पर्धेत स्थल स्पर्धेत सहभागी होत प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल फोंडाघाटमध्ये विजयी मिरवणूक काढून तिचा उत्साहात गौरव करण्यात आला.
एसटी स्टँडपासून फोंडाघाट प्रशाळेपर्यंत ही विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेचे चेअरमन, सेक्रेटरी, खजिनदार, सर्व सदस्य तसेच माजी खजिनदार अजित नाडकर्णी यांच्या उपस्थितीत कृष्णाईचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिलांनी औक्षण करून तिच्या यशाचा आनंद साजरा केला.
कार्यक्रमाला एनसीसीचे विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. पारकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून तो यशस्वीपणे पार पाडला. कृष्णाईच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा