विटे / (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) :
खानापूर व कडेगाव तालुक्यातील काही भागात बिबट्या दिसून आल्याने ग्रामस्थांत घबराट निर्माण झाली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी एका स्थानिक चॅनेलला बिबट्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
शिवणी ते शिवणी फाटा या रस्त्याला ताकारी कॅनॉल जवळ आर डी पवार सर यांच्या घराच्या अगदी जवळ बिबट्याची दोन लहान पिल्ले आज सायंकाळी साडे सहा वाजता दिसली आहेत. यां पिलासोबत मादी बिबट्या असण्याची श्यकता नाकारता येत नाही. यामुळे फाट्यावरून येताना व जाताना लोकांनी सावधगिरी बाळगावी व हा संदेश इतरांपर्यंत माहितीसाठी पाठवावा. पहाटे व्यायामासाठी जाणाऱ्या लोकांनी एकटे न जाता ग्रुपने सावधपणे जावे. जर कोणास बिबटे दिसल्यास त्यांना हाकलण्याचा प्रयत्न करू नये कारण पिल्ला मुळे मादी बिबट्या आक्रमक असतो.
असे शिवणीच्या पोलीस पाटलांनी आवाहन
केले आहे.
यापूर्वी अमरापूर परिसरात एका वासरावर बिबट्याने हल्ला केला असल्याचे लोक सांगत आहेत. एक मादी एक नर व चार पिल्ले असल्याची या भागात चर्चा आहे. त्यामुळे खानापूर कडेगाव भागात भीतीचे वातावरण आहे. वन खात्याने याबाबत तातडीने खुलासा करावा अशी लोकांची मागणी आहे. बिबट्याच्या वावराने शेतकरी शेतात जाण्यास देखील घाबरत आहेत.
