You are currently viewing वैभव नाईक यांनी कळसुली येथे घेतले गणरायाचे दर्शन

वैभव नाईक यांनी कळसुली येथे घेतले गणरायाचे दर्शन

वैभव नाईक यांनी कळसुली येथे घेतले गणरायाचे दर्शन

चंद्रहास उर्फ बबली राणे व दिलीप राणे यांच्या निवासस्थानी भेट; ३० वर्षांची परंपरा जपल्याबद्दल कुटुंबीयांकडून आभार

कणकवली

कळसुली विभागप्रमुख चंद्रहास उर्फ बबली राणे व दिलीप राणे यांच्या कळसुली येथील निवासस्थानी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी भेट देऊन गणरायाचे तसेच ग्रामदेवता श्री लिंग माऊलीचे दर्शन घेतले.

गेली ३० वर्षे वैभव नाईक हे सालाबादप्रमाणे होळी, रामनवमी आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राणे कुटुंबीयांच्या निवासस्थानी आवर्जून भेट देत आहेत. या दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आपुलकीच्या आणि कौटुंबिक संबंधांबद्दल राणे परिवाराच्या वतीने वैभव नाईक यांचे जाहीर आभार मानण्यात आले.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे राणे परिवारात आनंदाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा