*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पहाटे.. पहाटे…*
मला भेटला तू पहाटे पहाटे
निसर्ग सुंदर किती छान वाटे..
किलबिल बोली सुरम्य ती छान
गवताळ ओले सभोवती ते रान
पूर्वेस वासर गुलाबी गुलाबी
क्षितिजावरी ते केशर शराबी..
वेगात येती किरणे प्रसन्न
हिरव्यावरी ते आनंदकंद
धुक्यात न्हाती दिशा साऱ्या दाही
अवकाश सारे पसरे निळाई..
क्षणाक्षणातच चलत ते चित्र
रथावरी आरुढ होई मित्र
झरझर झरझर येण्याची घाई
वसुंधरा तृप्त होतच पाही..
चैतन्य पसरे फुटतेच पेव
उजळून निघतो गाव नि गाव
मोदात सारी सृष्टी नहाते
मला भेटला तू पहाटे पहाटे..
प्रा. सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
