You are currently viewing वृत्त.. चामर

वृत्त.. चामर

*पारिजात साहित्य समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री गझलकार डॉ शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*

 

वृत्त.. चामर

गालगाल/३ गालगा

 

द्यावया सुरेख साथ, रोज भेटते गझल

सांज वेळ मोहरून, छान हासते गझल

 

चांदण्यात लेखणीस, धार मस्त येतसे

मन तरंग डोलताच, धुंद वाटते गझल

 

का उगाच काळजीत, वावरायचे सदा

शब्दगंध वावरात मस्त बहरते गझल

 

सागरास भेटताच, शांत होतसे नदी

या अथांगशा मिठीत, मग सुखावते गझल

 

भूतकाळ का उगाच, वाद घालतो किती

फुंकताच ताप नष्ट, बघ फुलारते गझल

 

आसमंत ये फुलून, देह भान हरपुनी

हा वसंत तनमनात, छान नाचते गझल

 

वृत्त काफियात भाव, स्पंदनात गुंफता

सार्थता अलामतीत, रीत जागते गझल

 

डॅा.शरयू शहा.

॰॰॰॰॰॰॰॰॰

प्रतिक्रिया व्यक्त करा