काजू बागायतदारांत चिंतेचे वातावरण
सावंतवाडी
मळगाव परिसरात जंगली माकडांकडून मोठ्या प्रमाणात काजू पिकाचे नुकसान होत आहे. माकडांच्या या सततच्या उपद्रवामुळे काजू बागायतदारांत चिंतेचे वातावरण आहे. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यंदा थंडी हवी तशी न पडल्या कारणाने काजूला मोहोरही कमी प्रमाणात धरला होता. त्यात मध्यंतरी पडलेल्या अवकाळी पावमुळेही काजू पिकाचे नुकसान झाले. त्यात काही प्रमाणात धरलेल्या काजू पिकाचे सध्या जंगली माकडांकडून नुकसान होत आहे. हे माकड टोळीटोळीने काजू बागायतीत घुसून काजूचे बोंड खाण्याच्या नादात परिपक्व काजूसहीत मोहोर व कच्च्या काजूचे नुकसान करत आहेत. सध्या होत असलेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे रानटी जनावरे मनुष्यवस्तीत तसेच शेती बागायती तसेच आंबा व काजू बागायतीत घुसून नुकसान करत आहेत. या माकडांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील काजू बागायतदारांमधून होत आहे.