You are currently viewing कृष्णा राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
Oplus_16908288

कृष्णा राऊळ यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

सावंतवाडी / माडखोल : माडखोल गावचे उपसरपंच तथा माडखोल सेवा संस्था सोसायटीचे चेअरमन सन्माननीय कृष्णा राऊळ यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी थाटामाटात व उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गावातील विविध घटकांसाठी उपयुक्त वस्तू भेट देत वाढदिवसाचे अनोख्या पद्धतीने औचित्य साधले.

यावेळी कृष्णा राऊळ यांनी उपस्थितांना आणि गावाला ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून विविध महत्त्वपूर्ण वस्तूंची भेट दिली.

माडखोल प्राथमिक शाळा क्र. १ येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रिया तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरावा, यासाठी ब्लूटूथ स्पीकर भेट देण्यात आला. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

तसेच माडखोल गावातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना हुतात्मा स्मारकाची प्रतिमा भेट म्हणून प्रदान करण्यात आली.

याशिवाय माडखोल येथील श्री स्वामी समर्थ मठासाठी इन्व्हर्टर व बॅटरी भेट देण्यात आली. या सुविधेमुळे मठातील विजेची व्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित या समाजोपयोगी उपक्रमातून कृष्णा राऊळ यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश दिला. वाढदिवसानिमित्त मिळालेले उदंड प्रेम, शुभेच्छा आणि सहकार्याबद्दल उपसरपंच कृष्णा राऊळ यांनी मित्रपरिवार, ग्रामस्थ आणि सर्व शुभचिंतकांचे मनःपूर्वक व हार्दिक आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा