You are currently viewing कुंब्रल येथे उद्या पर्यटन महोत्सवाचे आयोजन

कुंब्रल येथे उद्या पर्यटन महोत्सवाचे आयोजन

दोडामार्ग :

 

दोडामार्ग तालुक्यातील कृषी व निसर्ग पर्यटन वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने सप्तधारा पर्यटन सेवा सहकारी संस्था मर्यादित दोडामार्ग या संस्थेतर्फे एक दिवसीय पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. १७ मे रोजी सकाळी १०.३० वाजता वाजता कुंब्रल येथे या सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्याचे उद्घाटन खास. विनायक राऊत यांचे हस्ते व सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व ऍड. एकनाथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सायंकाळी ४ वाजता महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते व उद्योजक तथा जिल्हा बँक संचालक गणेश गणपत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रात्री १० वाजता शुभम प्रोडक्शन सिंधुदुर्ग यांचा “इथे ओशाळला मृत्यू” हा ऐतिहासिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पर्यटन सेवा संस्थेतर्फे केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × five =