You are currently viewing नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विशेष क्लीन-अप ड्राइव्ह
Oplus_16908288

नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली विशेष क्लीन-अप ड्राइव्ह

सावंतवाडी शहर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचा पुढाकार

सावंतवाडी :

आपले घर स्वच्छ ठेवण्याबरोबरच शहरीही स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने सावंतवाडी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शिरोडा नाका ते स्वर्गीय भाईसाहेब सावंत समाधी परिसरादरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या मोहिमेत नगराध्यक्षा श्रद्धा लखम सावंत-भोसले, भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष युवराज लखम सावंत-भोसले, आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर तसेच सुकन्या टोपले यांनी प्रत्यक्ष सहभागी होत परिसराची स्वच्छता केली.

आरोग्य कृती समितीचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला. एन. बी. रेडकर, ॲड. तेजस परब, संजय पिळणकर, प्रदीप्ती कोटकरे, नारायण आकेरकर, गणराज रेडकर, सुनील मारुती तुळसकर, प्रतिभा रेडकर, ॲड. रितू रवींद्र परब, राहुल परब, शमिका नेमळेकर, रुपाली रेमुळकर, सचिन मोरजकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी दीपक म्हापसेकर व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून मार्गावरील कचरा हटवून परिसर स्वच्छ केला.

दरम्यान, ही स्वच्छता मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न ठेवता पुढील दोन दिवसही सुरू ठेवण्यात येणार आहे. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सावंतवाडीतील अधिकाधिक नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा