भाजप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज सावंतवाडीत
संघटनात्मक वाटचालीला नवी दिशा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते होणार सहभागी
सावंतवाडी : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज, बुधवार दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासह आगामी काळातील संघटनात्मक वाटचाल, पक्षाचे विविध उपक्रम आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन तसेच आगामी काळासाठी संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून, बैठकीस उपस्थित राहणाऱ्या सर्व मान्यवरांचे भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले आहे.
संघटनशक्तीला बळ देत आगामी राजकीय वाटचालीसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह
