You are currently viewing प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघातर्फे शिक्षक दिन संपन्न 
Oplus_16908288

प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघातर्फे शिक्षक दिन संपन्न 

प्राधिकरण निगडी – दिनांक ६ सप्टेंबर रोजी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त, निगडी येथील, दादा दादी विरंगुळा केंद्रामध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक भूषण ओझर्डे होते. सरस्वती व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर श्री.सुभाष बोरोले यांनी स्वागत गीत सादर केले. प्रा.ज्ये.नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर जोशी यांनी मनोगत व्यक्त करताना प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघात चालत असलेल्या कार्याचा आढावा घेतला .श्री भानुदास सोनगिरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिल्यावर , संघाचे अध्यक्ष, श्री. चंद्रशेखर जोशी यांनी पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला. आपल्या भाषणात , विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्याला आपले करिअर निवडण्यास स्वातंत्र्य द्यावे असे त्यांनी सांगितले.

श्रीमती विजयमाला आहेर यांनी दिलेल्या ₹ ५१०००/- रुपयांच्या देणगीतून तीन शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सत्कारार्थी होते.. श्री.नाथा मानकर, श्री.विजय पापत व डॉ.सौ.रजनी शेठ . त्यांचा परिचय अनुक्रमे श्री. श्रीराम शिंपी,श्री.श्रीनिवास ठोंबरे व श्रीमती विजया आहेर यांनी करून दिला

.त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.परीक्षक सौ संध्या हगवणे यांनी परीक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले.त्यांचाही शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या यादीचे वाचन श्रीमती कुंदा कोळपकर (शिक्षण व सहल समिती प्रमुख) व श्री.भगवान महाजन(माजी अध्यक्ष) यांनी केले. ६४ निवृत्त शिक्षकांना , संघातर्फे भेटवस्तू प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुंदा कोळपकर यांनी केले.श्री.दिलीप गोसावी (उपाध्यक्ष) यांनी आभार मानले.

सदर बातमीचा आढावा वरीष्ठ पत्रकार बाबू डिसोजा यांनी घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा