You are currently viewing नेरूरमध्ये ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा उत्साहात
Oplus_16908288

नेरूरमध्ये ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा उत्साहात

जय वेतोबा महिला गोविंदा पथक प्रथम; स्वराज्य माठेवाडा गोविंदा पथक कुडाळला द्वितीय क्रमांक

कुडाळ / नेरूर :

नेरूर देऊळवाडा येथे रणझुंजार मित्र मंडळ आणि जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘कलेचा देव कलेश्वर’ दहीहंडी स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक पावसकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या स्पर्धेत विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मानवी थर रचून उपस्थितांची मने जिंकली. गोविंदा पथकांच्या कौशल्यपूर्ण आणि चित्तथरारक कामगिरीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

जय वेतोबा महिला गोविंदा पथक विजेते

स्पर्धेत जय वेतोबा महिला गोविंदा पथकाने उत्कृष्ट कौशल्य, शिस्तबद्ध कामगिरी आणि संघभावनेच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या पथकाला १५ हजार रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर स्वराज्य माठेवाडा गोविंदा पथक, कुडाळ यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना ७ हजार रुपये रोख आणि आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

पारितोषिक वितरण प्रसंगी तसेच स्पर्धेदरम्यान देविदास नाईक, कल्पेश मार्गी, समीर उर्फ शंभूराज नाईक, प्रवीण नेरुरकर, पुनाजी नाईक, भाई नाईक, मंगेश घाडी, निलेश वालावलकर, संतोष नेरुरकर, भास्कर परब, लाड, बाळा पावसकर, संकेत घाडी आणि अमोल शृंगारे यांच्या हस्ते विजेत्या पथकांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, देवस्थान कमिटीचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ गोटू नाईक, नेरूर तंटामुक्ती अध्यक्ष आनंद नेरूरकर, मंडळाचे कार्यकर्ते शेखर गावडे, सिद्धेश नाईक, शंभूराज नाईक, सुधीर नेरुरकर, कृष्णा उर्फ गोट्या पाटकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा