शिवसेना गटनेते संजय आग्रे यांचा ५१वा वाढदिवस उत्साहात साजरा
मंदिरातील स्वच्छता सेवेतून दिवसाची सुरुवात; ग्रामपंचायत, शाळा-कॉलेज आणि कट्टा बैठक मित्रमंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन
कट्टा :
शिवसेना गटनेते श्री. संजयजी आग्रे यांचा ५१वा वाढदिवस विविध सामाजिक आणि सार्वजनिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या दिवशी सकाळी नित्यनेमाप्रमाणे श्री. पाचोबा मंदिर येथे झाडलोट व स्वच्छता सेवा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर विकास सेवा सोसायटी येथे केक कापून संजय आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन राजन नानचे, व्हाईस चेअरमन पिंटू पटेल, अजित नाडकर्णी, संदेश पटेल, सरपंच सौ. संजना आग्रे यांच्यासह सोसायटीचे सर्व कर्मचारी व सदस्य उपस्थित होते.
त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातही संजय आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच विश्वनाथ जाधव, फोनडेकर, माजी सदस्य अजित नाडकर्णी तसेच लाड मॅडम, प्रज्ञा सामंत, कुमारी जोईल गोसावी, सावंत यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी संजय आग्रे यांच्या कार्याचे तसेच सर्वांच्या मदतीला तत्परतेने धावून जाणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
शाळा-कॉलेजमध्येही वाढदिवसाचा उत्साह
यानंतर शाळा व कॉलेजमध्येही संजय आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी चेअरमन राजू पटेल, सेक्रेटरी शेखर आण्णा, खजिनदार सचिन तायशेटे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कट्टा बैठक मित्रमंडळाच्या वतीने जल्लोष
रात्री ८ वाजता कट्टा बैठक मित्रमंडळाच्या वतीने केक कापून संजय आग्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. शैलेंद्र आपटे, राजू पटेल, सुरेश टक्के, सुहास मोदी, भोगटे, तन्मय आपटे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित होती.
यावेळी मालदिकत कुबडे, राजू पटेल यांच्या पत्नी तसेच अनिल पटेल यांच्या सुनेने संजय आग्रे यांचे औक्षण केले. ‘बार बार ये दिन आये’ हे गाणे म्हणत वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी करूनही वाढदिवसाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला.
‘शून्यातून विश्व निर्माण करून संजय आग्रे यांनी इतिहास घडविला’
यावेळी संतोष टक्के व राजू पटेल यांनी संजय आग्रे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून इतिहास घडविला असल्याचे गौरवोद्गार काढले. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी, “संजयजी आग्रे यांची अशीच प्रगती होत राहो आणि माझ्या मित्राला भविष्यात आमदारकी मिळो,” अशी सदिच्छा व्यक्त केली.
संपूर्ण वाढदिवसाचे कार्यक्रम शिस्तप्रिय वातावरणात आणि नियोजित वेळेत पार पडले. उपस्थितांनी संजय आग्रे यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
