सांगली (प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार) :
रोटरी क्लब ऑफ सांगली यांच्यामार्फत गणपतराव आरवडे कॉलेज ऑफ कॉमर्स सांगली येथे 2 सप्टेंबर 2026 रोजी करियर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सांगलीचे अभिनंदन पाटील उपस्थित होते. अभिनंदन पाटील हे एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट (पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा) या पदावर काम करतात. हे या कॉलेजचे माजी विद्यार्थी देखिल आहेत. त्यांनी कॉमर्स क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या विविध संधी बद्दल माहिती दिली. तसेच कॉमर्स क्षेत्रात असणारे नवनवीन वाटा, विद्यार्थ्यांनी शिकत असताना आपल्या पार्ट टाइम वेळेत काम करून इन्शुरन्स कसा विक्री करायचा याबद्दल माहिती करून दिली.
एचडीएफसी लाइफ चा सक्षम प्रोग्रॅम ज्यामध्ये तुम्ही भाग घेऊन भविष्यामध्ये इन्शुरन्स कंपनीचा मॅनेजर बनू शकता याची देखील माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शेजार सर, उपप्राचार्य डॉ. शहा सर, तसेच डॉ चौगुले मॅडम यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शनलाभले.
सदर कार्यक्रमासाठी बीकॉम व एमकॉम या वर्गातील विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
