You are currently viewing चंद्रमा ग हसला

चंद्रमा ग हसला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी दुर्गादास पळसकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”चंद्रमा ग हसला”*

**************

 

निमिष एक मजला

सांगुन काहि गेला

हे पाहुनी नभीचा

चंद्रमा ग हसला//

 

बटा तुझ्या केसांच्या

गाली उभारलेल्या

नवरुप यौवनाची

चाहूल घेत आल्या //

 

सुरमा तुझ्या नयनीचा

धुंद होत गेला

अंतर्वेध तुज मनीचा

मीच की घेतला //

 

निमिष एक मजला

सांगून काहि गेला//

 

कवी दुर्गादास दि. पळसकर पुणे *

भ्रमणध्वनी क्र.७३८७९२३८९५

******************

प्रतिक्रिया व्यक्त करा