अलिबाग (प्रतिनिधी) :
रायगड जिल्ह्यातील शहाबाज गावचे साहित्यिक श्री.दिवाकर केशव म्हात्रे यांनी ३० ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता चेंबूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.ते ७४ वर्षाचे होते. मुंबईस्थित चुनाभट्टी येथून त्यांनी आपल्या साहित्यिक प्रवास सुरू केला. खरंतर कोणत्याही शैक्षणिक, साहित्यिक वारसा नसताना साहित्य क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख करताना ६००हून कथा लिहिल्या त्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या त्या सोबत दैनिक सामना, प्रहार या वृत्तपत्रांमधून लिखाण प्रसिद्ध झाले आहे. त्यांची ४४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामध्ये ४४ पुस्तके आहेत. ३३ कादंबऱ्या, ११ कथासंग्रह यांचा समावेश आहे. यातील तीन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची मान्यता लाभली होती. श्री .दिवाकर म्हात्रे यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “साहित्यरत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.अलिकडेच ठाणे येथे आगरी समाज मंडळ ठाणे, परिसर यांच्यामार्फत त्यांच्या कार्याची दखल घेऊन सन्मानपत्र,शाल, पुष्पगुच्छ श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले होते. त्याच्या पश्चात पत्नी शालिनी, विवाहित तीन मुली डॉ. अनघा डॉ.मनिषा, अभियंता तन्मयी अशा आहेत. त्यांच्या निधनाने शहाबाज गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर अलिबाग येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. त्यांनी दिवाकर म्हात्रे यांच्या रूपाने एक सिद्धहस्त लेखक हरपल्याची सहवेदना व्यक्त केल्या
