You are currently viewing जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे सेवानिवृत्त शिक्षक-रमाकांत जाधव यांचा सन्मान

जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे सेवानिवृत्त शिक्षक-रमाकांत जाधव यांचा सन्मान

जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी तर्फे सेवानिवृत्त शिक्षक-रमाकांत जाधव यांचा सन्मान!

दोडामार्ग

दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,दोडामार्ग चे सहाय्यक शिक्षक -रमाकांत कृष्णा जाधव हे आपल्या सेवेतील प्रदिर्घ आणि यशस्वी सेवेचा कालावधी पूर्ण करून शालेय सेवेतून नियत वयोमानानुसार गेल्या 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त झाल्याने ” सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतपेढी ओरोस तर्फे”ओरोस पतपेढी हॉलमध्ये वार्षिक अधिमंडळ बैठकीत रविवार दि.30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , पतपेढीचे चेअरमन -श्री.समीर परब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात पतपेढीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक-श्री.संदिप कदम यांच्या हस्ते श्री.रमाकांत जाधव यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,श्री.जाधव यांच्या समवेत त्यांच्या पत्नी -सौ.ज्योती रमाकांत जाधव( (नगरसेविका,नगर पंचायत कसई दोडामार्ग)ह्या देखील उपस्थित होत्या.यावेळी पतपेढीचे उपाध्यक्ष -पतपेढीचे विद्यमान उपाध्यक्ष-श्री.स्वप्निल पाटील,माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक-श्री.शरद देसाई,माजी उपाध्यक्षा व विद्यमान संचालिका -सौ.विद्या शिरसाट तसेच अन्य संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा