आ. वैभव नाईक यांनी मानले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार
आमदार वैभव नाईक यांच्या मालवण कुडाळ मतदारसंघात राज्य शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा विकासानिधी देण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील सर्वच रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.
कोविड काळात विकास कामे थांबवून आरोग्य यंत्रणेवर महाविकास आघाडी सरकारने लक्ष केंद्रित केले होते. मात्र कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मालवण मतदारसंघासाठी तब्बल १३० कोटी ३६ लाख ९१ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष पुरहानी रस्ते दुरुस्ती कार्यक्रम, अर्थसंकल्प, रस्ते व पुल परिरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम, पाटबंधारे योजना, एस. आर. बजेट, नाबार्ड योजना यांसह आदी योजनांमधून कुडाळ मालवण तालुक्यातील विविध विकास कामांसाठी गेल्या ४ महिन्यात हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेला कुडाळ मालवण तालुक्यातील एकही रस्ता निधीपासून वंचित ठेवलेला नाही. १०० टक्के रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. ही कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सा. बा. विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर यापुढील काळात ग्रामीण मार्गांना निधी मंजूर करण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये प्रयत्न केला जाणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
निधीच्या मंजुरीबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचे आ.वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.
मालवण शिवसेना शाखा येथे आमदार वैभव नाईक यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर प्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, किरण वाळके, संमेश परब, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर, दीपा शिंदे, यासह अन्य उपस्थित होते.
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवून अनेक रस्त्यांचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी विशेष पुरहानी दुरुस्ती कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३५ कोटी ७९ लाख ६४ हजार रु निधी मंजूर केला आहे. यामधील मंजूर कामे पुढील प्रमाणे..
१) मठ कुडाळ पणदूर घोटगे ते गारगोटी राज्य मार्ग क्र. १७९ रु २१३.३५ लाख ,
२)आचरा बंदर वरवडे फोंडा उंबरने राज्य मार्ग क्र.१८१, रु. ११०२.३६ लाख,
३)चिंदर कुडोपी बुधवळे प्रजिमा क्र.१८, रु. ९६.२० लाख,
४)कोटकामते बुधवळे बिडवाडी प्रजिमा क्र.१९, रु. ८३ लाख,
५) राठिवडे कसाल ओसरगाव प्रजिमा क्र.३०, रु. ५२.२२ लाख,
६) वागदे कसवण कसाल प्रजिमा क्र.३१, रु. १४१.७५ लाख ,
७)वायंगणी तळाशील प्रजिमा क्र.३३, रु. २२ लाख,
८)रानबांबुळी ओरोस वर्दे प्रजिमा क्र.३७, रु. ५१.२४ लाख,
९)मालवण कसाल राज्यमार्ग क्र.१८२, रु. ३२.५० लाख.
१०)झाराप आकेरी रा.मा.क्र.१८६ रु. २४२.५० लाख,
११)कनेडी कुपवडे शिवापूर विलवडे रा.मा.क्र.१९०, रु. १४०.०० लाख,
१२)सुकळवाड बाव प्रजिमा क्र.२७, रु. ३७.५० लाख,
१३)कुडाळ पिंगुळी कोचरे रस्ता रु. ७८.४० लाख,
१४)वेताळ बांबर्डे वाडोस प्रजिमा क्र. ३९, रु. २० लाख,
१५)कुडाळ पावशी आंबेरी प्रजिमा क्र.४० रु. ४६१.४० लाख,
१६)चौके धामापूर कुडाळ प्रजिमा क्र. ४१, रु ८९ लाख,
१७)कुडाळ रेल्वेस्टेशन रस्ता प्रजिमा क्र.४२ रु. ३८ लाख,
१८)वालावल आंदुर्ले मुणगी प्रजिमा क्र. ४४, रु. १२५ लाख,
१९)नेरूर चेंदवण कवठी प्रजिमा क्र.४५, रु.१३५.८५ लाख,
२०)पिंगुळी मानकादेवी प्रजिमा क्र.४६, रु १२६.०२ लाख,
२१)दाभोली तेंडोली माड्याचीवाडी प्रजिमा क्र.४९ रु. १२९.७१ लाख,
२२)आकेरी दुकानवाड शिवापूर प्रजिमा क्र. ५१ रु. १२५. ४६ लाख,
२३)राठिवडे असरोंडी ओसरगाव प्रजिमा क्र. २९, रु. २१ लाख
अर्थसंकल्पात कुडाळ मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्गांचे मजबुतीकरण करणे त्याचप्रमाणे पूल बांधणे, धुपप्रतीबंधक बंधारे बांधणे, संरक्षक बंधारा बांधणे हि नवीन कामे मंजूर झाली आहेत या कामांसाठी अर्थसंकल्पात ३२ कोटी ७८ लाख रु निधीची तरतूद करण्यात आली. त्याचबरोबर चालू वर्षातील मंजूर परंतु अपूर्णावस्थेत असलेल्या कामांना देखील वाढीव व उर्वरीत निधीची तरतूद करण्यात आली आहे.नवीन मंजूर कामे व निधी पुढीलप्रमाणे…
१) हडी पाणखोल जुआ ता.मालवण येथे संरक्षक बंधारा बाधणे निधी २ कोटी रु.
२) मसुरकर जुवा ता.मालवण येथे समुद्र धूपप्रतिबंधक बंधारा बाधणे निधी ३ कोटी ४८ लाख रु.
३) करंजा बंदर ते नारायण कुबल यांच्या घरापर्यंत ता. मालवण येथे धुपप्रतीबंधक बंधारा बांधणे निधी २ कोटी रु.
४) झाराप आकेरी सावंतवाडी बांदा दोडामार्ग आयी रस्ता रामा 186 मध्ये साईडपट्टीचे रुंदीकरण व सुधारणा करणे निधी ३ कोटी ५० लाख रु.
५) राठीवडे हिवाळे ओवळीये कसाल ओसरगाव आंब्रड कळसुली प्रजिमा ३० मध्ये कॉजवेच्या ठिकाणी पूल बांधणे निधी ८० लाख रु.
६) ओझर कांदळगाव मागवणे मसुरे बांदीवडे आडवली भटवाडी रस्ता प्रजिमा 52 मध्ये लहान पूलाचे जोडरस्त्यासह बांधकाम करणे निधी २ कोटी ०२ लाख ३०हजार रु.
७) वागदे हळवल शिरवल कळसुली रस्ता प्रजिमा २६ मध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण करणे निधी १ कोटी ८८ लाख रु.
८) पिंगुळी नेरूर (माणकादेवी) मार्ग प्रजिमा ४६ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी १५ लाख रु.
९) चौके धामापूर कुडाळ मार्ग प्रजिमा ४१ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ३ कोटी ५० लाख रु.
१०) नेरूर वालावल चेंदवण कवठी रस्ता प्रजिमा ४५ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी २ कोटी ४० लाख रु.
११) कुडाळ पावशी घावनळे आंबेरी माणगाव कुणकेरी रस्ता प्रजिमा ४० मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी १ कोटी ४७ लाख रु.
१२) काळसे वराड पेंडूर कट्टा गुरामवाड गोळवण वाडाचापाट मसदे मसुरे कावा प्रजिमा ३४ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ४ कोटी १७ लाख रु.
१३) सुकळवाड तळगाव बाव मार्ग प्रजिमा २७ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ३ कोटी रु.
१४) भरणी आगारवाडी ग्रा.मा. क्र. १२ रस्त्यावर लहान पूल बांधणे निधी १ कोटी २० लाख ७३ हजार रु.
रस्ते व पुल परिरक्षण व दुरूस्ती कार्यक्रम अंतर्गत कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाकरिता २० कोटी निधी मंजूर करण्यात आला असून यामधील मंजूर कामे पुढीलप्रमाणे..
१) मठ कुडाळ पणदूर घोटगे रस्ता रा.मा.१७९ मध्ये मजबूतीकरण व नुतनीकरण करणे निधी ४ कोटी ३९ लाख.
२) चौके धामापूर कुडाळ रस्ता प्रजिमा ४१ सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ३ कोटी २४ लाख.
३) मालवण वायरी देवबाग प्रजिमा – २८ मध्ये विशेष दुरुस्ती करणे निधी १ कोटी ३५ लाख.
४) ओझर कांदळगाव मोगरणे मसुरे बांदीवडे आडवली भटवाडी रस्ता प्रजिमा ५२ मध्ये विशेष दुरुस्ती करणे निधी १ कोटी ९६ लाख.
५) सुकळवाड तळगाव बाव प्रजिमा – २७ मध्ये रस्त्याची विशेष दुरुस्ती करणे निधी १ कोटी २५ लाख.
६) मालवण कसाल रस्ता रा.मा. १८२ मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे निधी ४ कोटी १२ लाख.
७) कुडाळ पावशी घावनळे आंबेरी माणगाव कुणकेरी कोलगाव रा.मा .१८१ ला मिळणारा रस्ता मध्ये विशेष दुरुस्ती करणे निधी २ कोटी ९८ लाख.
मालवण तालुक्यातील मसुरे- आंगणेवाडी लघु पाटबंधारे योजनेसाठी १९ कोटी ९५ लाख रु.
मालोंड- मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेसाठी ६ कोटी ८१ लाख रु,
कांदळगाव-मसुरे मुख्य रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख रकमेच्या निविदेस महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.
एस. आर. बजेट अंतर्गत पणदूर-घोटगे या राज्यमार्गासाठी ५ कोटी ६५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला असून या राज्यमार्गाच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले आहे.
नाबार्ड योजनेअंतर्गत २०२०-२१ या वर्षाकरिता कुडाळ तालुक्यातील मांडकुली भुईवाडी तेरसे बांबर्डे माळवाडी रस्ता ग्रा. मा. ४३० मध्ये मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ५४ लाख.
कट्टा एसटी स्टँड ते गुरामवाडी रस्ता ग्रा. मा. ३८० मध्ये लहान पुलाच्या बांधकामासाठी १ कोटी २८ लाख.
गुरामवाड कुंभारवाडी रस्ता ग्रा. मा. ३०३ मध्ये लहान पुलाचे बांधकाम करण्यासाठी ५१ लाख २७ हजार एवढ्या निधीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
कुडाळ नगरपंचायतीला मिनी फायर फायटर पुरविण्यासाठी 55 लाख निधी. अशी एकूण तब्बल १३० कोटी ३६ लाख ९१ हजार रुपये निधीची कामे गेल्या ४ महिन्यात आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झाली आहेत.