सावंतवाडी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३७व्या भागाचे थेट प्रक्षेपण आज सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात उत्साहात पाहण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भागामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प, युवकांसाठी नशामुक्त भारताचा संदेश तसेच समाजहिताशी निगडित विविध विषयांवर देशवासीयांना मार्गदर्शन केले.
उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांचे विचार मनापासून ऐकले. ‘मन की बात’ हा उपक्रम सामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा प्रभावी माध्यम ठरत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
