ओरोस:
खा. विनायक राऊत यांचा वाढदिवस यावर्षी रुग्णसेवा दिन म्हणून साजरा करण्याचे शिवसेनेचे बैठकीत ठरविले आहे या बरोबरच तालुका, विभाग गाव पातळीवर अशा मदतनीस आरोग्य सेविका यांचा सत्कार आणि तालुका स्तरावर, जिल्हा-उपजिल्हा रुग्णालय स्तरावर फळ वाटप, गरीब व गरजूंना कोरोना लस देण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्याचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सतीश सावंत म्हणाले, खासदार विनायक राऊत यांचा 15 मार्च रोजी होणारा वाढदिवस या वर्षी शिवसेनेच्या वतीने रुग्णसेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त कोरोना कालावधीत चांगले काम केलेले पोलीस पाटील, आशा मदतनीस अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, कोरोना योद्धा म्हणून काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे. खासदार विनायक राऊत यांचा 15 मार्च वाढदिवसदिनी कार्यक्रमाचे नियोजन सांगण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत शिवसेनेचे जि. प. गटनेते नागेंद्र परब, जि. प .सदस्य हरी खोबरेकर, विकास कुडाळकर, गितेश राऊत आदी उपस्थित होते.