You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्ग

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल तसेच राठीवडे ग्रामपंचायत यांच्या वतीने बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये राठीवडे गावचे उपसरपंच माननीय निखिल जाधव सर, पंचायत समिती सदस्य आडवली मालडी स्मिता परुळेकर मॅडम पंचायत समिती सदस्य शिरवंडे दीपक चव्हाण सर, ग्रामपंचायत सदस्य राठिवडे स्वप्निल पुजारी सर राजू परुळेकर सर,महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे
जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सर,राजेंद्र मेस्त्री सर, चंद्रशेखर परब सर,कर्मचारी विशाखा कासले मॅडम, पवित्रा शिर्के,हर्षद खरात आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या मेळाव्यामध्ये उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी विशाखा कासले मॅडम यांनी थोडक्यात अहवाल वाचन केले.दिव्यांग बांधवांच्या विविध प्रश्नांवर चर्चा व त्यांना आवश्यक सहकार्य मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला विभाग वार मेळावा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे जिल्हा समन्वयक श्री अनिल शिंगाडे सर यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच पंचायत समिती सदस्य स्मिता परुळेकर मॅडम यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.व शुभेच्छा दिल्या. तसेच दीपक चव्हाण यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व या मेळाव्याचा आपण फायदा करून घ्यावा असे सांगितले.व आपण कधीही आम्हाला हाक द्या आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असे सांगितले. तसेच राजेंद्र मेस्त्री सर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्यामध्ये तीसहून जास्त दिव्यांग उपस्थित होते. उपस्थित दिव्यांग बांधवांना महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच समाजामध्ये आत्मविश्वासाने व स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे सरांनी उपस्थित यांचा आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा