*अपघातात जखमी झालेल्या राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री यांना मा.आ.वैभव नाईक यांनी केली आर्थिक मदत*
कणकवली
हिवाळे रस्त्यावर डंपर आणि दुचाकी अपघातात राठिवडे येथील सत्यवान मेस्त्री व त्यांचा मुलगा भास्कर मेस्त्री हे गंभीर जखमी झाले आहेत. यातील भास्कर मेस्त्री याच्यावर गेले दोन महिने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज राठिवडे येथे सत्यवान मेस्त्री यांच्या घरी भेट देत त्यांची विचारपूस केली त्यांना धीर देत आर्थिक मदत केली. यावेळी शिवसेना आडवली मालडी विभागप्रमुख अमित फोंडके , युवासेना विभाग प्रमुख युवराज मेस्त्री, प्रवीण सावंत, सुभाष धुरी, पोईप विभागप्रमुख विजय पालव, सचिन कुमामेकर,देवेंद्र पुजारे आदी उपस्थित होते.
