You are currently viewing आजगाव मळेवाड येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

आजगाव मळेवाड येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

आजगाव मळेवाड येथे अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

रस्त्यावर अचानक झाडाची काठी आल्याने दुचाकीचा ताबा सुटला; प्रथमेश परब व सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली

वेंगुर्ले : प्रतिनिधी

आजगाव-मळेवाड येथील राजगड रिसॉर्टजवळ रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघाताची घटना घडली. शिरोडा परिसरात भाजी विक्रीसाठी जात असताना रस्त्यावर अचानक झाडाची काठी आल्याने भाजी विक्रेत्याच्या वाहनाचा ताबा सुटला. यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या वाहनाला धडक दिली.
या अपघातात वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ले युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंडया परब तसेच जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी प्रथमेश परब व सुधा कवठणकर यांनी नागरिकांना शांततेने व संयमाने परिस्थिती हाताळण्याचे आवाहन केले. तसेच अपघातामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन करत वाहने बाजूला घेण्यास सांगितले.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा