सावंतवाडीत ५ सप्टेंबरला श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव.
सावंतवाडी
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन), सावंतवाडी यांच्यावतीने ‘दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ५ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता बॅ. नाथ पै सभागृह, सावंतवाडी नगरपरिषद येथे हा भक्तिमय सोहळा रंगणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात भजन, कीर्तन, अभिषेक, प्रवचन, नाटिका तसेच स्वादिष्ट कृष्णप्रसाद अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. इस्कॉन पंढरपूरचे सहस्रनाम प्रभूजी यांचे विशेष प्रवचन यावेळी होणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य जन्माचे आणि कर्माचे तत्वज्ञान जाणून घेण्याची संधी भाविकांना या कार्यक्रमातून मिळणार आहे. कृष्णसेवेसाठी दूध, दही, अन्नधान्य, फुले, फळे आदी वस्तुंचे दान करू इच्छिणाऱ्या भाविकांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हरे कृष्ण संस्कार केंद्र, भटवाडी-सावंतवाडी येथे दर रविवारी सकाळी ११ वाजता साप्ताहिक सत्संगाचे आयोजन करण्यात येते.
