*मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा गर्जे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अलविदा….*
‘अलविदा ‘ एकच हा शब्द
तो स्तब्ध ती नि:शब्द
पाही ना कुणी कुणाची वाट
चालू लागली पाऊले वाट
वाटाही त्या दोन्ही समांतर
पुढेच जातील राखून अंतर
ध्येय गाठण्या आज स्वत:चे
मोल न जाणती ते प्रेमाचे
ध्येय गाठणे हेच स्वप्न जर
का प्रेमाचा डाव घडीभर
धाव धावणे आयुष्यभर
जीवन जगण्या उसंत ना क्षणभर
गाठभेट मग कधी वळणावर
काय बोलावे न सुचेल क्षणभर
जातांना ते म्हणतील एकदा
एकच हा शब्द ‘अलविदा’
@अरुणा गर्जे
सांगली
