You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये समुदाय सहभाग कार्यक्रमाचे आयोजन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये समुदाय सहभाग कार्यक्रमाचे आयोजन

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील विविध गावांमध्ये समुदाय सहभाग कार्यक्रमाचे आयोजन

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) च्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम (CEP) म्हणजे समुदाय सहभाग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सावंतवाडी परिसरातील विविध गावांमध्ये जाऊन जनसमुदायाला विविध उपक्रमाबद्दल माहिती देणे, रोजगाराच्या संधी साठी कौशल्य विकसित करणे हा यामागचा उद्देश आहे,जसे की सोप मेकिंग,हॅन्ड वॉश,फिनाईल,भेसळ तपासणी,एक्वा कल्चर,शोभिवंत मासे पालन, गांडूळ खत, मधुमक्षिका पालन,सोलार पॅनल,होम अप्लायन्सेस, जिओ टॅगिंग,ऑनलाईन फ्रॉड जनजागृती, अळंबी उत्पादन, सायबर सेक्युरिटी यासोबतच मोडी लिपी, संस्कृत,जर्मन,फ्रेंच भाषा यांचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. या विविध उपक्रमांची प्रात्यक्षिके महाविद्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे त्या अनुषंघाने पर्यटनाबद्दलही जनजागृती केली जाणार आहे.
महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक खेड्यापाड्यांमध्ये जाऊन वरील सर्व उपक्रमांचा संदर्भामध्ये जनजागृती व हँड्स ओन ट्रेनिंग देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये लोकांनी व विद्यार्थांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा