You are currently viewing उमरगा तालुक्यातील बळीराजासाठी एक हजार रोपांची मदत

उमरगा तालुक्यातील बळीराजासाठी एक हजार रोपांची मदत

(सेज ट्री आणि समाज विकास संस्थेचा सहभाग)

उमरगा : येथील समाज विकास संस्थेच्या अथक प्रयत्नातून सेज ट्री यांच्या सहभागात उमरगा लोहारा तालुक्यातील पाच शेतकऱ्यांसाठी 1000 आंब्याच्या रोपाची मदत केली. फळबाग लागवड योजनेच्या माध्यमातून इथला शेतकरी सुखी होईल. सर्वसामान्यांना स्वस्तात फळे मिळतील.ऑक्सिजन निर्माण होईल आणि भारत मातेच्या सुपुत्रांना सन्मानपूर्वक झोप येईल. म्हणून समाज विकास संस्था गेली तीस वर्षापासून पाणी,माती, अनाथ मुल, महिला, युवा यांच्यासाठी नियमित कार्यरत आहे या नवीन वर्षामध्ये सेज ट्री च्या सहकार्यातून आज 1000 रोपे शेतकऱ्यांच्या स्वाधीन केली. यातून शेतकऱ्यांच्या कडे समृद्धी येईल.बळीराजा सुखी होईल. म्हणून सातत्याने भूमिपुत्र वाघ आणि त्यांचे कार्यकारी मंडळ कार्य करत आहे. या उदात्त भावनेने शेतकऱ्यांना मदत झाली आहे.

भविष्यकाळामध्ये एक लाख फळांची रोपे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्याचं भूमिपुत्र वाघ यांचा स्वप्न आहे.आपणही मदतीसाठी भूमिपुत्र वाघ यांच्या पाठीशी उभे राहावं असे आव्हान समाज विकास संस्थेच्या वतीने केले आहे.

याप्रसंगी प्राध्यापक प्रभाकर कावळे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित, केले होते. याप्रसंगी वेंकट पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले.

या कार्यासाठी सेज ट्री चे विभागाचे प्रमुख प्रसाद गिरी,कन्हैया गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांचे उमरगा तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने धन्यवाद मानण्यात आले. आणि त्यांचा समाज विकास संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या फळांच्या रोपाची थेटे सर उमरगा,सूर्यवंशी साहेब बाबळसुर,व्यंकट पोतदार कोथळी, प्राध्यापक पाटील सर मुरूम, विजयकुमार गुरव सास्तुर,या शेतकऱ्यांना मदत झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा