You are currently viewing घोटगेवाडीत तिलारी नदीच्या प्रवाहात दोन मजूर गेले वाहून

घोटगेवाडीत तिलारी नदीच्या प्रवाहात दोन मजूर गेले वाहून

घोटगेवाडीत तिलारी नदीच्या प्रवाहात दोन मजूर गेले वाहून*

कॉजवे पार करताना दुर्घटना; आंबोली रेस्क्यू टीमकडून शोधमोहीम सुरू

दोडामार्ग

घोटगेवाडी-कोनाळ (ता. दोडामार्ग) येथे तिलारी नदीचा कॉजवे पार करताना दोन मजूर पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची दुःखद घटना आज, सोमवार (दि. १७ ऑगस्ट) रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडली.
वाहून गेलेल्या व्यक्तींमध्ये रेगन दिलीप बडे (वय ८ वर्षे) आणि अनुरंजन किसकोटा (वय २५ वर्षे) यांचा समावेश आहे. दोघेही सध्या घोटगेवाडी येथे वास्तव्यास असून, ते मूळचे छत्तीसगड येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
तिलारी नदीला सध्या पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना कॉजवे पार करताना ही दुर्घटना घडली. घटनेनंतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, वृत्त लिहिपर्यंत दोघांचाही ठावठिकाणा लागलेला नव्हता.
दरम्यान, आंबोली रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण करण्यात आले असून, नदीपात्रात शोधमोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा