You are currently viewing संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Oplus_16908288

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन

दोडामार्गमध्ये उपजिल्हा रुग्णालयात पंखे वाटप; विद्यार्थ्यांना झाडांचे वितरण

दोडामार्ग :

मा. जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आरोग्य व पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयात पंख्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच माध्यमिक विद्यालय, दोडामार्ग येथे विद्यार्थ्यांना झाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे.
या सामाजिक उपक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवा पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा