You are currently viewing दोडामार्ग कार्यकर्ता मेळाव्यात शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

दोडामार्ग कार्यकर्ता मेळाव्यात शहरातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

दोडामार्ग
दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ता मेळाव्यात दोडामार्ग शहरातील अनेकांनी रामचंद्र ठाकुर व रविंद्र खडपकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
त्यामुळे आगामी नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस ची ह्या दोन वाँर्ड मध्ये जोरदार मोर्चेबांधणी दिसत आहे. यावेळी व्यासपीठावर जिल्हाबँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, माजी मंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी तालूकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालूकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, माजी नगरसेवक रामचंद्र ठाकुर, सुदेश तुळसकर, दिपक जाधव, चित्रा देसाई, जावेद शेख, बाबा खतीब, प्रा.संदीप गवस, अँड.प्रवीण नाईक, बाबी गवस, रवींद्र खडपकर आदी उपस्थित होते.
माजी मंत्री प्रवीण भोसले म्हणाले, कार्यकर्त्यानी जनतेत जाऊन काम केले पाहिजे त्याचवेळी पक्ष बळकट होईल. असे सांगत, आज पक्ष सत्तेत आहे पण सिंधुदुर्गात आपल्या पक्षाला स्थान कोठे ? आहे अशी खंतही व्यक्त केली.
जिल्हाबँक उपाध्यक्ष सुरेश दळवी म्हणाले, राष्ट्रवादी पक्ष दोडामार्गात एक नंबर बनविणार आहे. जेव्हा कार्यकर्त्याला गरज पडेल तेव्हा त्याने हक्काने फोन करावा, पक्ष वाढीसाठी आम्ही तत्पर आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांना प्रधानमंत्री पदावर बघण्यासाठी हातात हात घालून, मतभेद विसरून काम करा हे ध्येय्य साध्य करू असेही दळवी म्हणाले. कार्यकर्त्याचा विमा आपण स्वतःच्या खर्चाने काढणार असून एक हजार जणांना याचा लाभ देणार आहे. सिंधुदुर्गात जिल्हा बँकेत झिरो बॅलन्स खाते पासबूक उघडणार आहे. त्यासाठी दोडामार्ग तालूकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यानी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा