You are currently viewing “त्या” वाहकनचालकांच्या कागदपत्रावरील स्थगिती उठवा…

“त्या” वाहकनचालकांच्या कागदपत्रावरील स्थगिती उठवा…

– सागर नाणोसकर

सिंधुदूर्गनगरी

जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात वाहन कराबाबत झालेल्या अफरा-तफरी अडचणीत आलेल्या संबधित वाहनधारकांच्या कागदपत्रावर लावण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी, अशी मागणी युवासेनेचे उपजिल्हाधिकारी रस्ता सुरक्षा समिती सदस्य सागर नाणोसकर यांनी केले आहे. याबाबत त्यांनी आज आरटीओ अधिकार्‍यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी निवेदन दिले असून, ते प्रसिध्दीस दिले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, सिंधुदूर्गनगरी कार्यालयात वाहन कर भरण्यावरुन झालेल्या अपहारात अनेक चांगले आणि प्रतिष्ठीक लोक अडचणीत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी कराची रक्कम भरुन सुध्दा त्याची कागदपत्रे स्थगित करण्यात आली आहे. सदयस्थिती लक्षात घेता झालेल्या अपहाराची चौकशी सुरू आहे. आणि दुसरीकडे या सर्व प्रकारामुळे नाहक “त्या” प्रतिष्ठीक लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या मागणीची दखल घेवून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी नाणोसकर यांनी केेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − three =