*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी विलास कुलकर्णी यांचा मार्गदर्शनपर लेख*
*मोठा अभंग कसा लिहायचा*
मनाची पालखी
मनाची पालखी l आपणच भोई l
जगभर नेई l निमिषात l
पालखीत आले l परिवार मुले l
विस्मरण झाले l विठ्ठलाचे l
अचपळ मन l खोटी मोह माया l
काया गेली वाया l विकारात l
अज्ञानी पामर l नाहीं ब्रह्मज्ञान l
जिणे नामाविन l व्यर्थ भासे l
आप्पा म्हणे नित्य l संसारी राहून l
करावे स्मरण l श्रीहरीचे l
विलास कुलकर्णी
(आप्पा महाराज )
मीरा रोड
7506848664
मोठा अभंग
पहिला विषय निवडा
अभंगाला शीर्षक द्यावे
विषय निवडला असेल तर त्यावरच लिहावे
मोघम लिहू नका
6664 मोठा अभंग अशा प्रकारे लिहितात.
पहिल्या चरण खंडात 6 अक्षरे
दुसऱ्या चरण खंडात 6 अक्षरे
तिसऱ्या चरण खंडात 6 अक्षरे
चौथ्या चरण खंडात 4 अक्षरे
दुसऱ्या व तिसऱ्या खंडात यमक जुळले पाहिजे.
चरणाच्या चार भागांना खंड म्हणतात.
चार खंड मिळून जी अर्थपूर्ण ओळ तयार होते तिला चरण म्हणतात. असे 5 ते 6 चरण लिहावेत. पहिला चरण पुन्हा पुन्हा गायला जातो म्हणून अभंग फार मोठा लिहू नये. नाहीतर गायकाची दमछाक होईल.
आता माझा अभंग पहा
पहिला चरण
मनाची पालखी 6 अक्षरे
आपणच भोई 6 अक्षरे
जगभर नेई 6 अक्षरे
निमिषात 4 अक्षरे
दुसऱ्या व तिसऱ्या खंडात ई अक्षराने यमक जुळले आहे.
दुसरा चरण
पालखीत आले 6 अक्षरे
परिवार मुले 6 अक्षरे
विस्मरण झाले 6 अक्षरे
विठ्ठलाचे 4 अक्षरे
दुसऱ्या व तिसऱ्या खंडात ले अक्षराने यमक जुळले आहे.
असेच विषयाला धरून अजून दोन चरण लिहिले आहेत.
शेवटी अभंग कर्त्याची नाम मुद्रा म्हणून
आप्पा म्हणे लिहून संदेश दिला आहे.
आहे की नाही सोपे
शुभम भवतू
विलास कुलकर्णी
( आप्पा महाराज )
मीरा रोड
7506848664
