You are currently viewing स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमुकल्यांना शालेय गणवेशाची भेट

स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमुकल्यांना शालेय गणवेशाची भेट

सांगली महापालिकेच्या बालवाडीतील १,२११ विद्यार्थ्यांना २,४२२ गणवेशांचे वाटप!

विटे (प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार) : स्वातंत्र्य दिनाच्या ८० व्या पर्वाच्या पूर्वसंध्येला सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागाने बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविला. शाळा क्र. १, सांगली येथे आयोजित कार्यक्रमात महापालिकेच्या बालवाडीतील १,२११ चिमुकल्यांना प्रत्येकी दोन याप्रमाणे एकूण २,४२२ शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले.

 

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. बानु मुसा जमादार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला आहे.

महापालिकेच्या जेंडर बजेटमधील ५ टक्के राखीव निधीतून (सन २०२६-२७) हे गणवेश खरेदी करण्यात आले आहेत.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तसेच सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, त्यांच्यात एकसमानतेची भावना रुजावी आणि शाळेप्रती आपुलकी व आत्मविश्वास वाढावा, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

या गणवेश वाटप सोहळ्याला महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. बानु मुसा जमादार यांच्यासह समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

यामध्ये श्रीमती विद्या बाबासाहेब नलवडे, सौ. योगिता परशुराम राठोड, सौ. मीनाक्षी सदाशिव पाटील, सौ. रोहिणी सत्यजीत पाटील, सौ. लक्ष्मी रघुनाथ सरगर, सौ. रईसा वसिम शिकलगार, सौ. वैशाली राजू गवळी, सौ. मुब्बशिरिन इजहार बागवान, सौ. बिलकिस बानुसादिक, सौ. अश्विनी नंदकुमार कोळेकर, सौ. अंजली अजित जाधव, सौ. अश्विनी चेतन कदम, सौ. नसिमा गैबिसो नाईक आणि सौ. रेश्मा जुबेर चौधरी यांचा समावेश होता.

यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त (महिला व बालकल्याण) विद्या पाटील, महिला व बालविकास अधिकारी बाबासाहेब माळी , शिक्षण विभागाचे समन्वयक श्री. सौदंत्ते सर, महानगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चिमुकल्यांमध्ये आनंदाचे वातावरण:

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवीन गणवेश मिळाल्यामुळे बालवाडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहत होता. महानगरपालिकेच्या माध्यमातून बालकांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

या उपक्रमामुळे महापालिकेच्या बालवाडी शिक्षणाच्या प्रवाहात अधिक सुधारणा होईल, असा विश्वास समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा