You are currently viewing NIA टीम मुंबईत दाखल…

NIA टीम मुंबईत दाखल…

काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) पथक मुंबईत दाखल झाले आहे. या पथकाकडून अँटिलिया निवासस्थानाबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय, हे पथक हिरेन मनसुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेईल, असेही सांगितले जात आहे.

 

मंगळवारी मुंबईत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे हे पथक दाखल झाले. या पथकात पोलीस महासंचालक (IG) दर्जाच्या एका अधिकाऱ्याचा समावेश असल्याचे समजते. कालच या पथकाने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्याकडून तपासाची प्राथमिक माहिती घेण्यात आली.

 

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आतापर्यंत हा तपास  होता. त्यामुळे आता एनआयए गुन्हे शाखेकडे तपासासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करु शकते. तसेच, पुढे एनआयए स्फोटके अंबानींच्या घरापर्यंत आलीच कशी? याचाही माग काढण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहावे लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 13 =