You are currently viewing वामनराव महाडिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

वामनराव महाडिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

*प्रा. अन्वी गवाणकर यांना जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक*

कणकवली / तळेरे : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तळेरे येथील मराठी व इतिहास विषयाच्या शिक्षिका प्रा.अन्वी गवाणकर यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

अध्यापन क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्या सोबतच प्रा. गवाणकर या विविध शैक्षणिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या हरहुन्नरी शिक्षिका म्हणून परिचित आहेत. मराठी भाषा,साहित्य आणि इतिहास या विषयांची त्यांना विशेष आवड असून विद्यार्थ्यांमध्ये वाचन लेखन, साहित्यिक जाणिवा आणि सर्जनशीलतेची गोडी निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.

प्रा.अन्वी गवाणकर यांनी यापूर्वी देखील राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेमध्ये सुयश प्राप्त केलेले आहे.

त्यांनी मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील लौकिकात आणखी भर पडली आहे.

त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्य कार्य.अधिकारी श्रीकृष्ण खटावकर, शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडिक, सर्व शाळा समिती सदस्य, प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा